🏛️ शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी शासकीय योजना
या योजनांच्या अर्जासाठी लागणारी कागदपत्रे आणि पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसाठी grampanchayat कार्यालयात संपर्क साधावा.
☀️ पीएम-कुसुम योजना: शेतामध्ये सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप
💧 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना: वैयक्तिक व सामूहिक शेततळे
🌱 आधुनिक सिंचन पद्धती: ठिबक व तुषार सिंचन योजना लाभ
🌳 मनरेगा फळबाग व वृक्षलागवड योजना: समृद्ध शेती, हक्काचे उत्पन्न
☀️ पीएम-कुसुम सौर कृषी पंप योजना
अर्ज सुरू- ७/१२ आणि ८-अ उतारा (१.५ एकर ते ५.१ एकर किंवा अधिक क्षेत्र नोंद)
- बँक पासबुक आणि आधार लिंक असणे आवश्यक
- शेतजमिनीत विहीर किंवा कूपनलिका असणे आवश्यक
शेतकऱ्यांना दिवसभरात शेती पंपासाठी अखंडित वीज मिळण्याकरिता ९०% ते ९५% सरकारी अनुदानावर ३ HP, ५ HP किंवा ७.५ HP चे सौर पंप दिले जातात.
💧 मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
नियमित सुरू- कृषी विभागाची तांत्रिक मंजुरी पत्र
- जातीचा दाखला (लागू असल्यास)
- बँक खाते तपशील आणि आधार कार्ड
शेततळ्यातील पाण्याचा साठा टिकवून ठेवण्यासाठी प्लास्टिक अस्तरीकरण (लिनर) करण्यासाठी शासनातर्फे आर्थिक अनुदान दिले जाते.
🧱 मनरेगा सिंचन विहीर योजना
₹५ लाख अनुदान- किमान ०.४० हेक्टर (१ एकर) जमीन, ७/१२ व ८-अ उतारा
- अर्जदाराकडे मनरेगाचे सक्रिय जॉब कार्ड असणे अनिवार्य
- विहीर नसल्याचे प्रमाणपत्र व भूजल सर्वेक्षण अहवाल
शेतकऱ्यांना हक्ताचे सिंचन मिळवून देण्यासाठी नवीन विहीर खोदणे आणि तिच्या बांधकामासाठी शासनाकडून ५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते.
🚜 मनरेगा वैयक्तिक/सामूहिक शेततळे
₹४.८२ लाख अनुदान- जमीन मालकीचा दाखला (७/१२ आणि ८-अ उतारा)
- मनरेगा अंतर्गत नोंदणीकृत सक्रिय जॉब कार्ड
- कृषी सहाय्यकाकडून तांत्रिक मंजुरी आणि जागेचा नकाशा
पावसाचे पाणी साठवून ऐन उन्हाळ्यात पिकांना संरक्षित पाणी देण्यासाठी मोठ्या आकाराच्या शेततळ्याच्या निर्मितीसाठी शासनाकडून ४.८२ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते.
🌳 मनरेगा फळबाग व वृक्षलागवड योजना (गोड कडुनिंब इ.)
३ वर्षे संगोपन खर्च- शेतजमिनीचा अद्ययावत ७/१२ आणि ८-अ उतारा
- अर्जदाराचे मनरेगा जॉब कार्ड व आधार लिंक बँक खाते
- फळबाग लागवडीसाठी कृषी विभागाचा संमती अहवाल
बांधावर किंवा पडीक जमिनीवर आंबा, काजू, पेरू, कडुनिंब किंवा औषधी वृक्ष लागवडीसाठी खड्डे खणणे, रोपे खरेदी आणि ३ वर्षांपर्यंत झाडे जगवण्यासाठी मजुरी व खतांचा खर्च पूर्णपणे दिला जातो.